कॉरंटाईनच्या भीतीने बहिणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला, आता आपल्याला कॉरंटाईन करतील, या भीतीने दोन बहिणींनी ४ दिवस वडिलांचा मृतदेह घरात ठेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना विरार येथे मंगळवारी उघडकीस आली आहे. यामध्ये एका बहिणीचा मृत्यू झाला असून, तर दुसरीला वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे.

वडिलांचे निधन झाले म्हणून…

विरार पश्चिमेच्या अग्रवाल गार्डन येथील गोकुळ टाऊनशीप मध्ये ब्रोकलीन आपर्टमेंट येथे हरिदास सहरकर (७२) हे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते आणि त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर त्यांचे घर चालत होते. त्यांना विद्या (४०) आणि स्वप्नाली (३६) या दोन अविवाहित मुली होत्या. १ ऑगस्ट रोजी हरिदास यांचे निधन झाले. मात्र वडिलांचे निधन हे कोरोनामुळे झाले, असे मुलींना वाटले. हे जर समजले तर सर्वांना कॉरंटाईन करतील, अशी भीती मुलींना वाटली. यामुळे त्यांनी वडिलांचा मृतदेह घरातच दडवून ठेवला.

समुद्रात उडी मारुन आत्महत्या

मंगळवारी विद्या हिने नवापूर समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली, तिची ओळख पटली नव्हती. बुधवारी सकाळी लहान बहीण स्वप्नाली हिने देखील याच समुद्रात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभात फेरीसाठी आलेले नागरिक आणि स्थानिक पोलिसांनी तिला वाचवले. तिच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here