Sitara Devi Biography in Marathi : भारताची सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी

351
Sitara Devi Biography in Marathi : भारताची सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी

‘कथ्थक’ ही शास्त्रीय नृत्याची अविभाज्य शैली आहे. (Sitara Devi Biography in Marathi) ही शैली विसाव्या शतकात भारतात आणि जगात प्रसिद्ध करण्यात नृत्यांगना सितारा देवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बनारस आणि लखनौ घराण्यातील नृत्यशैली त्यांनी एकत्रितपणे समाविष्ट करून एका आगळ्या वेगळ्या नृत्याचा आविष्कार केला होता.

सितारा देवी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील संस्कृत आणि नाट्यशास्त्राचे विद्वान होते. त्यांचे नाव सुखदेव महाराज. त्यांची आई मत्स्याकुमार यांचे संबंध नेपाळच्या राजघराण्यासोबत होते. त्यादेखील नृत्यांगना होत्या. सितारादेवी यांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला असल्यामुळे लक्ष्मीच्या नावावरून त्यांचे नाव धनलक्ष्मी असे ठेवण्यात आले. त्या सोळा वर्षांच्या असतांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचा उल्लेख ’नृत्यसम्राज्ञी’ म्हणून केला. हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान होता. टागोर यांनी या मुलीमधली कला अचूक हेरली होती. (Sitara Devi Biography in Marathi)

(हेही वाचा – Maratha Reservation : ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल)

पौराणिक कथा सत्यवान आणि सावित्री जीवनावरील नाटकामध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या नृत्याला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून वडिलांना खूप अभिमान वाटला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव ’सितारा देवी’ असे ठेवले. सितारा म्हणजे नक्षत्र. खरोखरच त्या नृत्याच्या आभाळातल्या सिताराच होत्या.

त्यांनी पंडित बिरजू महाराज यांचे वडील अच्छ्न महाराज यांच्याकडूनही नृत्याचे धडे गिरवले आहेत. नृत्य हेच त्यांचे जीवन होते. लहानपणी त्यांना या कारणामुळे शाळा सोडावी लागली आणि त्यांचे कुटुंब मुंबईत आले. मुंबईत जहांगीर हॉलमध्ये त्यांनी पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. (Sitara Devi Biography in Marathi)

अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १६ व्या वर्षीच त्यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. देश-विदेशात त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम होऊ लागले. अमेरिका, युरोप, सोवियत संघ अशा देशांमध्येही त्यांची ख्याती पसरली. सितारा देवी यांनी १३ मे १९७० रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य सादर करण्याचा विश्वविक्रम केला आहे. पुण्यातील एका संग्रहालयाला कथ्थकक्वीन ‘सितारादेवी कला संग्रहालय’ असे नाव देखील देण्यात आले आहे.

सितारादेवी यांना संगीत नाटक अकादमी, ‘पद्मश्री कालिदास सन्मान’, ‘पद्म भूषण’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र पद्म भूषण पुरस्कार त्यांनी स्वीकारला नाही. कारण त्यांचं म्हणणं होतं की त्यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळायला हवा. त्यांची प्रतिभा इतकी मोठी होती की, त्यांना याहीपेक्षा मोठा सन्मान प्राप्त व्हायला हवा. (Sitara Devi Biography in Marathi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.