बापरे! ई-बसची 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू ,तर…

150

अनियंत्रित इलेक्ट्रिक बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री कानपूरच्या ताटमिल चौकात घडली. या बसने 17 वाहनांना धडक दिली असून, यात 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

6 जणांचा जागीच मृत्यू

यासंदर्भातील माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास, ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेने चालवण्यास सुरुवात केली आणि मध्येच जो दिसेल त्याला तुडवत निघून गेला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे.

( हेही वाचा :जर वाईन शेतक-यांच्या हिताची, तर गांजाची शेती करण्यासाठी परवानगी द्या! )

कारवाई केली जाईल

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये, शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर आणि अरसलान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहे.आरएम डीव्ही सिंह यांनी सांगितले की, हा अपघात ई-बस (क्र. युपी 78 जीटी 3970 ) बसचा झाला. खाजगी एजन्सी पीएमआय ई-बसच्या संचालन आणि देखभालीसाठी जबाबदार आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून, कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.