ऑगस्ट महिन्यात ‘या’ आर्थिक घडामोडींवर तुमचं लक्ष हवंच

ऑगस्ट महिन्यात सहा महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी घडणार आहेत.

132
ऑगस्ट महिन्यात ‘या’ आर्थिक घडामोडींवर तुमचं लक्ष हवंच

ऋजुता लुकतुके

आपलं आर्थिक नियोजन चोख हवं असं सगळ्यांनाच वाटतं. पण, त्यासाठी थोडं जागरुकही रहावं लागतं. आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक घडामोडींचं भान ठेवावं लागतं. आज तुम्हाला सांगणार आहे ऑगस्ट महिन्यातल्या महत्त्वाच्या सहा घडामोडींविषयी आणि त्यांचा तुमच्यावर होणाऱ्या परिणामांविषयी…

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण

रिझर्व्ह बँक दर दोन महिन्यांनी एक बैठक घेऊन आपलं पतधोरण ठरवते. यात बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर ठरतात. एप्रिल आणि जून महिन्यात मध्यवर्ती बँकेनं कर्जावरील व्याजदर जैसे थे ठेवले. त्यामुळे कर्ज आणखी महाग झालं नाही. पण, यंदा अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत.

अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं रिझर्व्ह बँकेनं ठरवलं तर आपल्याकडेही कर्जावरील व्याजदर वाढू शकतात. याचा सगळ्यात मोठा परिणाम कर्जाचा हप्ता वाढण्यात होणार आहे. आणि त्यामुळे मासिक खर्चां नियोजनही बिघडणार आहे.

रिझर्व्ह बँकेची पतधोरणाची बैठक 10 ऑगस्टला होणार आहे. यात रेपो रेट वाढला तर गृह तसंच इतर कर्जं महाग होतील. आणि मुदतठेवींवरील व्याजदर मात्र वाढतील.

उच्च व्याजदर असलेल्या मुदतठेवींमध्ये गुंतवणुकीची अखेरची संधी?

मे 2022 मध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवायला सुरुवात केली. तेव्हापासून अनेक बँकांनी आपले मुदतठेवींवरील व्याजदर वाढवले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन मुदतठेव योजना बाजारात आणल्या. पण, अशा काही योजनांची मुदत ऑगस्टमध्ये संपणार आहे. म्हणजे ऑगस्ट नंतर या मुदतठेव योजना बंद होतील.

अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून चढा व्याजदर मिळवायचा असेल तर ऑगस्टचा शेवटा महिना तुमच्या हातात आहे.

उदाहरणच द्यायचं झालं तर आयडीबीआय अमृत महोत्सव मुदतठेव योजना, स्टेट बँकेची अमृतकलश मुदतठेव योजना, इंडियन बँकेची आयएनडी मुदतठेव योजना यांची मुदत 15 ऑगस्टला संपत आहे. या योजनांवर 7.25 ते 7.75 टक्के असा व्याजदर लागू आहे.

पण, त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतच गुंतवणूक करता येणार आहे.

आर्थिक विवरणपत्र स्वप्रमाणित करायला विसरू नका

ऑगस्ट महिना आर्थिक विवरणपत्रासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. 31 जुलै विवरणपत्र भरायची अंतिम मुदत होती. त्यानंतर एका महिन्यात तुम्हाला विवरणपत्र स्वप्रमाणित करून आयकर विभागाकडे छाननीसाठी पाठवायचं आहे. विवरणपत्र भरल्यानंतर एका महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय विवरणपत्र भरण्याची क्रिया पूर्ण होत नाही.

विवरणपत्र प्रमाणित करण्याची प्रक्रिया ऑनलाईनही करता येते. फक्त ती ऑगस्ट महिन्यातच पूर्ण करावी लागेल.

मुदतीत विवरणपत्र भरलं नसेल तर विलंब शुल्क आणि दंड वेळेत भरा

काही कारणांनी 31 जुलैच्या मुदतीत विवरणपत्र भरता आलं नसेल तर तुम्हाला विलंब शुल्कासह विलंबित विवरणपत्र भरण्याची सोय आहे. 31 डिसेंबर पर्यंत ते तुम्ही भरू शकता. पण, त्यावर विलंब शुल्क आणि देय आयकरावर दंड म्हणून रक्कम भरावी लागेल.

ही दंडाची रक्कम भरायला तुम्ही जितका उशीर कराल तेवढी दंडाची रक्कम वाढेल. कारण, देय रकमेवर दर महिन्याला १ टक्के इतका दंड लागू होतो. आणि ऑगस्ट नंतर हा दंड २ टक्के होतो. तेव्हा हा अतिरिक्त भुर्दंड टाळण्यासाठी ऑगस्टपूर्वी विलंब शुल्क आणि दंड भरून टाका.

सणासुदीच्या दिवसांत खर्चावर आवर घाला

ऑगस्ट नंतर भारतीय सणांना सुरुवात होते. दिवाळी – नवरात्रीपर्यंत सणांचाच माहौल असतो. पण, हीच वेळ आहे आपल्या खर्चाच्या सवयींकडे लक्ष द्यायची.

अशा खर्चासाठी बजेट बनवा. आणि त्यानुसार खर्च करा. ई-कॉमर्स कंपन्यांच्या सवलत योजनांना भुलू नका. आवश्यक असेल त्याच वस्तू खरेदी करा. आणि भेटवस्तू देतानाही काळजी घ्या. फसवणुकीला बळी पडू नका.

क्रेडिट कार्ड कंपन्यांचे नवे नियम समजून घ्या

आपण एखादं क्रेडिट कार्ड विकत घेतो. त्यानंतर त्यातले फिचर्स विसरून जातो. फिचर्समध्ये झालेले बदल आपल्याला ईमेलवर कळवले जातात. पण, आपलं दुर्लक्ष होतं. पण, ऑगस्ट हा महिना अनेक बँकांसाठी फिचर्समध्ये बदल करण्याचा आहे हे लक्षात ठेवा.

त्यानुसार आपल्या क्रेडिट कार्डावरील सवलतींमध्ये झालेले बदल तपासून पाहा. ॲक्सिस बँकेनं कॅशबॅक सवलतीत बदल केले आहेत. आणि ते २ ऑगस्टला लागू होणार आहेत. इतरही कार्डांचे बदलले नियम तपासून पाहा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.