पुण्यात मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमध्ये सहा वाहनांना आग

147

शुक्रवारी, १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २.१८ वाजता नरहे, हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर, पुणे याठिकाणी आग लागल्याची घटना घडली, त्यानंतर नवले अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन रवाना झाले. घटनासथळी पोहोचताच इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याचे पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पूर्ण विझवत धोका दूर केला.

fire1

४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान

तत्पूर्वी दलाची मदत पोहचण्याआधी स्थानिकांनी बादली आणि नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाकडून वेळोवेळी शहरात राबविण्यात येणारी अग्निशमन सुरक्षाविषयक प्रात्यक्षिक, संवाद यामुळे नागरिकांमध्ये आग आणि त्याच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आगीमध्ये ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तसेच पार्किंगवरील सिलिंगच्या काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. ही इमारत तळमजला अधिक सहा मजले अशी असून आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश गोरे, वाहन चालक पांगारे तसेच जवान भरत गोगावले, शिंदे आणि मदतनीस द. नलवडे, प्र. नलवडे, वि. मछिंद्र यांनी सहभाग घेतला.

(हेही वाचा भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैद्राबाद आणि मराठवाड्याने दिला होता स्वातंत्र्यलढा, असा घडला मराठवाडा मुक्तिसंग्राम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.