वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील जीर्ण स्कायवॉक कोसळला, पण…

188

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक झोपड्यांवर कोसळल्याची घटना आज मंगळवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वांद्रे पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या जुन्या स्कायवॉकचा काही भाग आज, मंगळवारी झोपड्यांवर कोसळला. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

हा स्कायवॉक जीर्ण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – घाबरू नका..! सत्तेच्या खुर्चीवर मी बसणार नाही, तुम्हालाच बसवेन; राज ठाकरेंची कोपरखळी)

दरम्यान, एमएमआरडीएकडून कोट्यावधी रुपये खर्च करुन स्कायवॉकचे काम केले जात आहे. मात्र या स्कॉय वॉकचा वापर आवश्यक तितका केला जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक स्कायवॉक तर जुगार खेळणा-यांचा अड्डा झाले आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकच्या उपयुक्ततेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.