भारताच्या प्रसिद्ध ‘स्कायडायव्हर’ शीतल महाजन (Skydiver Sheetal Mahajan) यांनी नुकतेच सर्वाधिक उंचीच्या माउंट एव्हरेस्टजवळ भारतीय ध्वजासह सर्वात उंच फ्लॅग जंप लँडिंग केले.
या कामगिरीमुळे त्या एव्हरेस्टवर राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंग करणाऱ्या पहिल्या भारतीय, तर तीन ध्रृवांवर स्कायडाईव्ह करणारी जागातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. पद्मश्री महाजन यांनी माउंट एव्हरेस्ट परिसरातील सांगबोचे येथे स्काय डायव्हिंग केले. त्यांनी २१, ५०० फूट उंचीवरून भारतीय ध्वजासह लँडिंग केले.
(हेही वाचा – Jammu Bus Accident : जम्मूत प्रवासी बस कोसळली दरीत; ३० जण ठार)
त्यांनी उत्तर व दक्षिण ध्रृवानंतर माउंट एव्हरेस्ट या तिसऱ्या ध्रृवावर स्कायडाइव्ह करून जगातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला आहे. भारतीय ध्वजासह माउंट एव्हरेस्टजवळ सर्वात उंच फ्लॅग जंप लँडिंग पूर्ण करीत असताना हा विक्रम घडत होता. उंचीच्या अचूकतेसाठी माउंट एव्हरेस्टच्या दिशेने जवळून उडी मारण्यासाठी महाजन यांना विशेष तयारी करावी लागली, असे त्या सांगतात.
आजच्या या दिवसाची १६ वर्षांपासून प्रतिक्षा करत होते. ते माझे मोठे स्वप्न होते. संयम आणि दृढ निश्चयाने स्वप्ने सत्यात उतरू शकतात याचा हा पुरावा आहे. असे पद्मश्री शीतल महाजन या विक्रमानंतर म्हणाल्या.
हेही पहा –