आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; 4 ठार, 45 हून अधिक जण जखमी

146

उत्तर प्रदेशच्या इटावा येथील आग्रा एक्स्प्रेस वेवर एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. या गंभीररित्या जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – सय्यद यांच्यावर पेडणेकरांचा पलटवार! म्हणाल्या, त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही)

काय घडला प्रकार

उत्तर प्रदेशच्या इटावा येथील आग्रा एक्स्प्रेस वेवर शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. एक खासगी स्लीपर बस गोरखपूरहून अजमेरला जात असताना डंपरला धडकली. या घटनेनंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी बचावकार्य सुरू केले. हे डंपर वाळूने भरल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. मात्र हा अपघात कसा घडला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच या स्लीपर बसमध्ये 50 हून अधिक लोक होते. यापैकी 45 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना सैफई येथील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.