लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा…

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (92) यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसून आली. शुक्रवारी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतीत समदानी यांनी एका इंग्रजी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल
गेल्या शनिवारपासून लता मंगेशकर यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.  मात्र याबाबत मंगळवारी जाहीर करण्यात आले. उपचारादरम्यान लतादीदींना न्यूमोनियाचीही लागण झाली. पाहिल्या दिवसापासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा दिसून येत नाही, तोपर्यंत रुग्णालयातच ठेवले जाईल, असे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.

भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान

डॉक्टरांची टीम लतादीदींच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनासह त्यांना न्यूमोनियाही झाला आहे. लता मंगेशकर यांना बारा दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती लता मंगेशकर यांची भाची रचना हिने केली आहे. लता मंगेशकर यांच्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून प्रार्थना केली जात आहे. आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला होता. 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here