‘या’ योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, नवं वर्षात वाढणार व्याजदर!

141

येत्या नवं वर्षात अल्प बचत योजना अर्थात स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकार 31 डिसेंबर 2022 रोजी अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते.

(हेही वाचा – राज्यपालांकडून भूमिका स्पष्ट, अमित शाहांना पत्र; म्हणाले, ‘…स्वप्नातही कल्पना करू शकत नाही’)

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी अल्प बचत योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन करणार आहे. यामध्ये पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना, एनएससी (Small Saving Scheme) यासारख्या अल्प बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा पॉलिसी व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, रेपो दर 5.90 वरून 6.25 टक्के करण्याच आला आहे. परंतु सरकारने अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवलेले नाहीत. पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर 7.1 टक्के, NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 टक्के, सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज कायम असल्याने रेपो रेट 2.25 टक्क्यांनी वाढवल्यानंतर या योजनांचे व्याजदर सरकार वाढवू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तिसऱ्या तिमाहीत फक्त किसान विकास पत्राचा व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. तर मॅच्युरिटी कालावधी 124 महिन्यांवरून 123 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के करण्यात आला आहे. तर मासिक खाते योजनेवरील व्याजदर 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्के, पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 5.5 टक्क्यांवरून 5.7 टक्के, 3 वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 5.5 टक्क्यांवरून 5.8 टक्के कऱण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.