वाघांचे दात आणि नखांची तस्करी

नागपूरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दात आणि नखांची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ही तस्करी वनविभागानं उघडकीस आणल्यानंतर पाच आरोपींपैकी एक आरोपी, वनविभागाशी संबंधित संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पीआरटीचे सदस्य आहेत असे आढळून आले आहे.

पाच आरोपींना पकडले

मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. तस्करी होत असल्याची टीप वनविभागाला मिळाली होती. उमरेड बसस्थानकावर ही तस्करी होणार असल्याची टीप मिळाल्याने, उमरेड वनपरिक्षेत्राच्या टीमनं सापळा रचला. या कारवाईत तीन आरोपींना पकडण्यात आलं. त्यांच्या चौकशी दरम्यान अजून दोन आरोपींची माहिती मिळाली. मेळघाटच्या सायबर सेलने या दोन आरोपींना पकडले आहे. ताराचंद नेवारे (४१), दिनेश कुंभले (३०), अजय भानारकर (२४), प्रेमचंद वाघाडे (५०), राजू कुळमेथे (३८) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी राजू कुळमेथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत तर ताराचंद नेवारे हे पीआरटी सदस्य आहेत.

( हेही वाचा : मुलींच्या पौंगडावस्थेतील लोहाची कमतरता वाढवा, स्त्रीरोगतज्ज्ञांचं आवाहन )

कारवाई सुरू

उमरेडमधील मौजा या भागांतून आरोपींना दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी पकडण्यात आलं. या प्रकरणात अजून आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाची कारवाई सुरु आहे. असे, उमरेड वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एस.जी.चांदेवार यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here