महाश्वेता देवी (Mahasweta Devi) ह्या भारतातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. बंगाली भाषेत त्यांनी विपूल लेखन केले आहे. अत्यंत संवेदनशील आणि वैचारिक लेखनातून त्यांनी कादंबरी आणि कथांच्या माध्यमातून साहित्य समृद्ध केले, असे म्हणावे लागेल. कारण त्यांचे साहित्य अजरामर आहे. आपल्या लेखन कार्यासोबतच महाश्वेता देवींनी समाजसेवेत नेहमी सक्रियपणे सहभाग घेतला.
महिला, दलित आणि वनवासींच्या हक्कांसाठी संघर्ष –
महिला, दलित आणि वनवासींच्या हक्कांसाठी त्यांनी (Mahasweta Devi) व्यवस्थेशी संघर्ष आणि दोन हात केले. महाश्वेता देवींनी लहान वयातच लिहायला सुरुवात केली आणि विविध साहित्यिक मासिकांमध्ये लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाका येथील जिंदबहार लेनमध्ये झाला. त्यांचे वडील मनीष घटक हे प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक होते. आई धरित्री देवी याही साहित्याच्या अभ्यासक होत्या.
शिक्षिका आणि पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात –
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून कारकिर्दीला (Mahasweta Devi) सुरुवात केली. पुढे त्या कलकत्ता विद्यापीठात इंग्रजी शिकवू लागल्या. १९८४ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. दरम्यान त्या लिहू लागल्या होत्या आणि साहित्यिक म्हणून नावारुपाला आल्या. त्यांच्या (Mahasweta Devi) काही रचनांवर चित्रपटही तयार झाले. कल्पना लाझमी यांनी त्यांच्या ‘रुदाली’ या कादंबरीवर आधारित ‘रुदाली’ हा चित्रपट तयार केला. चित्रपट निर्माते गोविंद निहलानी यांनी १९९८ मध्ये ‘हजर चौरासी की मां’वर आधारित याच नावाचा चित्रपट बनवला.
(हेही वाचा – साहित्य गौरव पुरस्कार विजेते Labhshankar Thakar)
१९८६ मध्ये पद्मश्री आणि १९९७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित –
महाश्वेता देवी (Mahasweta Devi) यांना १९७९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९८६ मध्ये पद्मश्री आणि १९९७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेल्सन मंडेला यांच्या हस्ते त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी मिळालेले ५ लाख रुपये त्यांनी बंगालच्या पुरुलिया आदिवासी समितीला दान केले. ‘अरण्यार अधिकार’ ही त्यांची कादंबरी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community