ज्याच्या आवाहनानंतर शेकडो विद्यार्थी झाले आक्रमक, कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ?

152

मुंबईत सोमवारी अचानक शेकडो रस्त्यावर उतरले. ऑनलाईन परीक्षेसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेरलं. विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. आज राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हे सर्व विद्यार्थी आले कुठून, त्यांचं नेतृत्व कोणी केलं? कुणाच्या आवहानानंतर ते रस्त्यावर उतरले, असे अनेक प्रश्न पोलीसांसह सरकारलाही पडले. त्यानंतर हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आले. कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ, त्याचं नेमकं नाव काय, तो करतो काय, कुठल्या पक्षाशी तो संबंधीत आहे असे अनेक प्रश्न फक्त सरकारच नाही तर सामान्यांनाही पडले.

गेल्या चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले. हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओमुळे हे आंदोलन झाले आहे का? का त्यामागे राजकीय पक्षाचा हात आहे का? याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण या आंदोलनामुळे हिंदुस्थानी भाऊ पुन्हा चर्चेत आला आहे. नेमका कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ ? जाणून घ्या….

हिंदुस्तानी भाऊचा व्हिडिओ होणारा व्हायरल

कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ?

  • या हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास फाटक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसला होता.
  • बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिलाय.
  • रुको जरा, सबर करो… या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला.
  • यूट्यूबवर प्रसिद्ध होण्याआधी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक एक पत्रकार होता.
  • टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विकास फाटक मुंबईमधील एका स्थानिक वर्तमानपत्रात क्राईम रिपोर्टर होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी 2011 मध्ये विकास फाटकला पुरस्कारही मिळाला आहे.
  • कोरोना नियम मोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला बेड्याही ठोकल्या होत्या.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.