गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना रक्ताचा कर्करोग झाला असल्याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या मुलगा अनिकेत आमटे यांनी त्यांच्या उपचारांची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – … तर ‘मविआ’नं योग्य तो निर्णय घ्यावा, मुनगंटीवारांनी दिला सल्ला )
अनिकेत आमटे यांनी डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिली. प्रकाश आमटे यांना 27 जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघड्याने सर्व व्हिझिटर्सना रुग्णालयात प्रवेश बंद केला आहे. तसेच त्यांची प्रकृती कशी आहे, डॉक्टरांना फोन करून विचारू नये, वेळोवेळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जातील, असेही अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात म्हणजेच 13 जूनदरम्यान, प्रकाश आमटे हे बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया बरा झाल्यानंतर आता कर्करोगावरील उपचारांसाठी त्यांना मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community