‘स्माईल’ने दिला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना संशोधित उपकरणाचा आधार

94

नागरिकांना उपयुक्त अशा वस्तू, उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणाऱ्या नव उद्योजकांना (Start-ups) प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने “सोसायटीफॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल” बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या पहिल्या तुकडीतील नव उद्योजक आणि त्यांची संशोधित अत्याधुनिक उपकरणे आता मुंबई महानगरपालिकेत उपयोगात आणून रुग्णालयांमध्ये वापरास प्रारंभ करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : MSRTC : मुंबई-पुणे महामार्गावरून धावणाऱ्या शिवनेरी बसची जागा शिवाई घेणार? तिकीट दरही होणार कमी)

रुग्ण सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी मदत

नव उद्योजकांना (Start-ups) प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने “सोसायटीफॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल” बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून नव उद्योजकांनी संशोधित केलेल्या वस्तू, उपकरणे, तंत्रज्ञानाचा अवलंब महानगरपालिकेच्या विभागांमध्ये करणे, त्यातून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे आणि त्यासोबतच या नव उद्योजकांना भरारी घेण्यासाठी सहाय्य करणे, हा स्माईल उपक्रमाचा हेतू आहे. या संकल्पनेनुसार तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोत्साहन देण्यात आलेली ५ नव उद्यमींची पहिली तुकडी ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आली होती. या तुकडीने संशोधित केलेली उत्पादने व तंत्रज्ञान आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रायोगिक तत्वावर वापरण्यास उपलब्ध झाली आहेत. या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये वापरासाठी आता उपलब्ध झाली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे रुग्ण सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी मदत करणार असून सोबतच या नव उद्यमींना देखील त्यातून पाठबळ मिळणार आहे असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून स्माईल कौन्सिल उपक्रम राबवला जात असून येत्या काळात या प्रकारचे आणखी काही प्रकल्प महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याकरिता कार्यवाही सुरु आहे. या उपक्रमामुळे नवउद्यमींच्या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानास, उत्पादनांना अधिक वाव मिळेल. तसेच तरूण उद्योजकांना मुंबई महानगरामध्ये अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

नव उद्योजकांच्या या पहिल्या तुकडीतील नव उद्योजक, त्यांची संशोधित अत्याधुनिक उपकरणे, त्यांचा महानगरपालिकेत उपयोग याविषयीची माहिती :

हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड:

या स्टार्ट-अप संसर्गजन्य रोगांसाठी विषाणुंच्या गुणसुत्रीय क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेंसिंग) विश्लेषणावर काम करत आहे. हा स्टार्ट अप महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे, यामुळे आरोग्य सेवांचे निर्णय अधिक चोखपणे घेता येतील.

अयाती डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेड:

या स्टार्टअपने एक नवीन न्यूरोथेरपी स्क्रीनर उपकरण विकसित केले आहे, जे ‘मधुमेहपूर्व’ टप्प्यात मधुमेहाच्या रुग्णांची लवकर तपासणी करण्यात मदत करते. जेणेकरून, मधुमेही रुग्णांच्या संदर्भात पाय विच्छेदनाची परिस्थिती टाळता येईल. या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या २ उपकरणांचा महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपयोग सुरु करण्यात आला आहे. यामुळे संभाव्य मधुमेही रुग्णांसाठी जलद व प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करण्यास आरोग्य विभागाला मदत होणार आहे.

आयु डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेड:

आयु डिव्हासेस यांनी ‘ब्लूटूथ सक्षम स्टेथोस्कोप’ हे नावीन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय मंडळींना रूग्णांचे निरीक्षण करण्यासाठी शरीराच्या इच्छित अवयवांवर स्टेथोस्कोप ठेवण्यास आणि संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सुरक्षित अंतर राखण्यास या आधुनिक उपकरणाची मदत होणार आहे. कारण, ब्ल्यूटूथ हेडफोनद्वारे डॉक्टरांना निरीक्षण ऐकण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सदर उपकरण स्वयंचलितपणे प्रत्येक रुग्णाची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदवते आणि संग्रहीत करते. परिणामी, हस्तलिखित नोंदींची गरज दूर होऊन वेळेची देखील बचत होते. या तंत्रज्ञानाची ७५ उपकरणे महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी उपलब्ध झाली आहेत.

बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड:

या स्टार्टअपने प्रगत कृत्रिम हात तयार केलेला आहे, जे इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक नैसर्गिक आणि मुक्त-हालचाल करण्यास मदत करतात. या तंत्रज्ञानाचे ४ प्रगत कृत्रिम हात महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी उपलब्ध झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.