बॅग शोधण्यासाठी केली वेबसाईटच हॅक

122

विमान प्रवास करताना अनेकदा बॅग बदलण्याचे प्रकार घडतात. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. सामान हरवल्यास त्या संदर्भात रितसर तक्रार एअरलाईन्स कस्टमर सर्व्हिस डेस्क किंवा वेबसाईटवर करता येते. परंतु अनेकदा तक्रार करूनही या एअरलाईन्सकडून प्रतिसाद मिळण्यास विलंब होतो. असाच अनुभव पाटण्याहून बंगळुरूला जात असलेल्या इंजिनीअर तरुणाला आला.

( हेही वाचा : आता सर्वसामान्यांचे ‘घर’ घेण्याचे स्वप्न महागणार! )

एअरलाईन्सची वेबसाईट हॅक

इंडिगोच्या विमानाने प्रवास करत असताना सॉफ्टवेअर इंजिनीअर नंदन कुमार यांची बॅग बदलली गेली. बॅग बदल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी प्रथम कस्टमर केअरशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी वेबसाईटवर तक्रार करून सुद्धा योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून नंदन यांनी शेवटी एअरलाईन्सची वेबसाईट हॅक केली.

ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी आणि सहकार्य करावे

इंडिगोची वेबसाईट हॅक करून नंदन यांनी वेबसाईटवरून सहप्रवाशाचे नाव व पत्ता शोधून काढले. त्यानंतर त्याच्याशी फोनवरून संवाद साधला. तो प्रवासी जवळच राहत असल्याने त्यांनी त्यांची बॅग परस्पर बदलून घेतली. त्यानंतर याची माहिती ट्वीट करून सांगितली. यावेळी एअरलाईन्सच्या वेबसाईटमध्ये अनेक त्रुटी आहेत इंडिगोने ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी आणि सहकार्य करावे अशी अपेक्षा नंदन यांनी ट्वीट करत व्यक्त केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.