सोलापूर-गाणगापूर बसला भीषण अपघात, 30-35 जणं गंभीर जखमी

सोलापूर-गाणगापूर बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात 30-35 जणं गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट-मैंदर्गी या मार्गावर हा अपघात झाला असून अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतर फडणवीसांनी सावरलं; राऊत म्हणाले Ohhh… loud speaker!)

अपघातातील 30-35 गंभीर प्रवाशांवर अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र या ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्यामुळे उपचारास अडचणी येत आहेत, त्यामुळे खासगी डॉक्टरांना उपचारासाठी बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे अक्कलकोट येथे ट्रॉमा केअर सेंटर तयार असूनही उद्घाटनाअभावी रूग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वेळीच अपघातस्थळी पोहचत मदतकार्य सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रामा केअर सेंटरची इमारत नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यासाठी अद्याप स्टाफ मंजूर करण्यात आलेला नाही. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील ही मागणी घातली असून तात्काळ मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here