प्रशासन अनेक उपाययोजना करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करत आहे. सोलापूर जिल्ह्यात अद्याप पहिला डोस न घेतलेले तब्बल ६ लाख नागरिक आहेत. यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील चार लाखांहून अधिक जणांचा समावेश आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण पूर्ण न झालेल्यांना पेट्रोल दिले जाणार नाही असे आदेश दिले आहेत.
पेट्रोलपंपावर लसीकरण सुविधा
लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ज्यांनी लस घेतली नाही त्यांना आता पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाणार नाही. शिवाय अधिक गर्दी असलेल्या ६ पेट्रोलपंपावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे अशी माहिती, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
( हेही वाचा : सरकार म्हणतयं कोविड काळातही रोजगार वाढला )
…तर कारवाई होणार
मंगळवारपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जे नागरिक लस न घेता पेट्रोल मागतात, न दिल्यास वाद घालतात त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. ज्या पंपावर लस न घेतलेल्या वाहनधारकांना पेट्रोल दिले जात आहे, त्या पेट्रोल पंंपांवरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय त्याच ठिकाणी लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community