उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसमवेत शासकीय स्तरावर सुद्धा अनेक प्रयत्न केले जातात. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थापनेस ६० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सार्वजनिक जागांवर फळबाग करण्याची मोहीम सोलापूर जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी स्थानिक प्रजातींच्या फळरोपांची लागवड करण्यासह, परिसर वृक्षाच्छादित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये अभियान राबवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
( हेही वाचा : कर्ज महागली! कोरोनाच्या काळानंतर २ वर्षांनी वाढवला रेपो दर )
फळबाग लागवड केली जाणार
या कार्यक्रमाची अंमलबजावणी मे महिन्यापासून करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण जमीन, शासकीय व निमशासकीय जमीन, सामुहिक जमीन व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना तालुका व गावस्तरावर देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक लाभार्थींच्या जमिनीवर देखील वृक्षलागवड करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर व पडिक जमिनीवर देखील वेळ लागवड करता येते. कृषी विभागाच्या धोरणानुसार किमान नऊ महिन्यांची वाढ झालेल्या फळ रोपांची लागवड करावी, अशाही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यामध्ये चिंच, आवळा, बोर, डाळिंब यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community