सोमालियाच्या किसमायू शहरात कार बॉम्बस्फोट आणि बंदुकीच्या गोळीबारात नऊ जण ठार झाल्यानंतर, शनिवारी दुपारी राजधानी मोगादिशूमध्ये दोन वेगवेगळ्या कारमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय किमान 300 लोक जखमी झाले आहेत.
(हेही वाचा –#BoycottCadbury का होतंय ट्रेंडिंग? कॅडबरीच्या जाहिरातीशी पंतप्रधान मोदींचा काय संबंध?)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमालियाची राजधानी मोगादिशू अध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी रविवारी सकाळी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी शिक्षण मंत्रालयासह अनेक सरकारी कार्यालये असलेल्या परिसरात हे भीषण स्फोट झाले. हा परिसर खूप गजबजलेला आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नसून हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राष्ट्राध्यक्षांनी या हल्ल्याचे वर्णन करताना क्रूर आणि भ्याड असल्याचे सांगत अल-शबाब गटाला दोषी ठरवले. विशेष म्हणजे यापूर्वी 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने अनेकदा राजधानी मोगादिशूला लक्ष्य केले आहे. याआधी 2017 मध्ये अल-शबाब गटाने मोठा स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
Join Our WhatsApp Community