पुणेकर बनले अतिशहाणे…म्हणतात ‘आम्हाला लस, मास्क आणि चाचणीही नको!’

106

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहेत. परदेशी प्रवासावर निर्बंध लावण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी घेण्यास सूचित केले आहे. सद्यपरिस्थितीत कोरोनावर लस आणि मास्क एवढेच उपाय उपलब्ध असल्यामुळे प्रशासनाने मास्क, लस तर काही ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. पण अशी सक्ती न करता मास्क, लस, आरटीपीसीआरसाठी लागू केलेले सक्तीचे आदेश मागे घेण्याची मागणी पुण्यातील काही संस्थांनी केली आहे.

सक्तीचे आदेश मागे घ्यावे

पुण्यातील पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सा संस्था आणि राजीवभाई स्वदेशी अभियान यांच्यावतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याद्वारे मास्क, लस, आरटीपीसीआर सक्तीचे आदेश मागे घेण्याची मागणी या संस्थांनी केली आहे. केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रात स्पष्ट केले आहे की लस घेणे स्वेच्छीक आहे. यानुसार ही मागणी करण्यात आली आहे.

( हेही वाचा : नवी मुंबईकरांची स्वस्तात होणार मेट्रोने ‘कुल’ जर्नी )

निर्बंध नको

लस घेण्यासाठी दबाव बनवणे, एसटी प्रवास, रेल्वे प्रवास, विमान प्रवास, शासकीय कार्यालय, शाळा, ऑफिस, रेशन, पेट्रोल अशा प्रकारच्या सुविधांवर निर्बध घालणे हे भारतीय राज्य घटनेच्या कलम 14, 19 व 21 चे उल्लंघन ठरते. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.