पोलीस आयुक्तांच्या निवृत्तीच्या वाटेवर पोलिसांचे डोळे

107

मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईत वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहे. मुंबईकरांकडून एकीकडे या उपक्रमांचे स्वागत करण्यात येत असले तरी दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये पांडे यांच्या विरुद्ध नाराजीचे सूर उमटत आहे. संजय पांडे यांचा कार्यकाळ कधी संपून ते निवृत्त होतात याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकारी डोळे लावून बसले आहे.

( हेही वाचा : पोक्सो संदर्भातील ‘ते’ आदेश दोन दिवसांत मागे घ्या; बाल हक्क संरक्षण आयोगाचे पोलीस आयुक्तांना पत्र)

मुंबई पोलीस दलाचे आयुक्त म्हणून फेब्रुवारी महिन्यात संजय पांडे यांनी पदभार स्वीकारला आहे, पांडे हे येत्या ३० जून रोजी सेवेतून निवृत्त होत आहे. आयुक्त म्हणून पांडे यांना केवळ चार महिन्याचा कार्यकाळ मिळाला आहे. या चार महिन्यात पांडे यांनी मुंबई पोलीस दलाचा चेहरामोहराच बदलण्याचा प्रयत्न केला. मुंबईत अनेक उपक्रम राबवत असताना त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचा कुठलाही विचार केला नाही. क्षुल्लक चुकावरून पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या बदल्या करणे, त्यांना घालून पाडून बोलणे, त्यांचे ऐकून न घेणे यामुळे संजय पांडे हे पोलीस अधिकाऱ्याचा मनातून उतरत गेले. समता नगर, वनराई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्याच्या अचानक बदल्या केल्यामुळे तर मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पोलीस दलात एका वेगळेच वातावरण तयार झाले, पोलीस आयुक्त हे अधिकाऱ्याचे ऐकूनच घेत नाही, आणि थेट बदल्या करून मोकळे होतात यामुळे पोलीस दलात अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

पोलीस ठाणेच काय तर गुन्हे शाखा असो अथवा वाहतूक विभाग येथील अधिकाऱ्यांचा पांडे हे सर्वांसमोर पाणउतारा करतात असे पोलीस सूत्र सांगतात. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काही प्रमाणात चांगले उपक्रम राबविले असले तरी काही ठिकाणी त्यांनी अतिशयोक्ती केल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहे. जून महिना उजाडताच मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी देव पाण्यात बुडवून बसले आहे, पांडे यांच्या निवृत्तीचा एक एक दिवस मोजत आहे. आजचा दिवस तर गेला उद्या काय होते याचीच भीती अनेक अधिकारी यांच्या मनात असते असे अनेक अधिकारी गुपचूप बोलत आहे. संजय पांडे यांच्या निवृत्ती नंतर येणारे पोलीस आयुक्त कोण असतील याची उत्सुकता अधिकाऱ्यांना लागली आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांची कारकीर्द

स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी केलेल्या कारवाईमुळे पांडे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून उतरले होते. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, परंतु तो स्वीकारला नाही. त्यांनी राजानीमा परत घेतला, मात्र त्यावेळेपासून पांडे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला होता. २०१५ मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर राहून त्यानंतर महासंचालकही झाले होते. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं गेलं.

९ एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर २७ फेब्रुवारी ला संजय पांडे यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली. येत्या ३० जून रोजी पांडे हे पोलीस दलातून निवृत्त होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.