विरारमध्ये गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू; धक्का बसलेल्या वडिलांनीही सोडले प्राण

151

देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दांडिया खेळायला मिळत असल्याने लोकांमध्ये यंदा कमालीचा उत्साह आहे. मात्र याचदरम्यान अत्यंत दु:खद घटना घडली असून गरबा खेळणाऱ्या तरुणाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ७ जागांसाठी पोटनिवडणूक )

एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू

विरार पश्चिम येथील ग्लोबर सिटीमध्ये राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवारात गरबा खेळत होत. त्यावेळी अचानक त्याला ह्रदय विकाराचा झटका आला. यानंतर त्याच्या वडिलांनी ( नरपत जैन ६५) आणि तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच मृत्यू झाला.

रुग्णालयात उपचाराआधीच मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकताच या धक्क्याने त्याचे वडील नरपत जैन यांनाही ह्रदय विकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सुद्धा करण्यात आली आहे. गरबा खेळताना एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.