मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या फुल मार्केटची सर्वत्र चर्चा असते. कारण या ठिकाणी असणारी फुलं ही ताजेतवानी असल्याने ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. मुंबईतील बाजारात दादर व भुलेश्वर या ठिकाणच्या मार्केटला वसईतून फुल पुरविली जातात. त्यामुळे वसईतील या ताज्या फुलांना बाराही महिने चांगली मागणी असते, पण त्यांना भावही चांगला मिळत असतो. तसेच या मार्केटमध्ये सोनचाफ्याचा सुंगध देखील दरवळत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का… मुंबईला कोणतं गावं हा सोनचाफा पुरवत असते.
सोनचाफा पुरविणारे गावं
वसई तालुक्यातील काही गावांत आगाशी, नाळा, सत्पाळा, राजोडी, नवापूर, वटार आदी ठिकाणी मोगरा, जाई-जुई, चमेली, चाफा, सोनचाफा या सुगंधी फुलांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. सत्पाळा गावात सोनचाफ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
…म्हणून ही फूलं थेट दादर मार्केटला रवाना होतात
वसई तालुका हा पूर्वीपासून फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. वसईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने वसईतील फुले थेट दादर मार्केटला शेतकरी स्वतःच घेऊन जातात. दादरला फूलविक्री केल्यानंतर त्या ठिकाणाहूनच सर्व किरकोळ विक्रेते फुले घेऊन जातात. वसईत जवळपास लहान-मोठे असे तीन हजार शेतकरी असून, एका दिवसाला संपूर्ण वसई तालुक्यात २० ते २२ लाखांची उलाढाल होते.
(हेही वाचा – ‘वारणा’कडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांनी वाढ)
मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या बाजारात वसईच्या चाफ्याची शेकडा ५० ते ६० रुपये भावाने विक्री होते. अन्य फुलांची किलोप्रमाणे विक्री होत असून, फुलांच्या जातीप्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. दररोज सकाळी पहिल्या लोकलने वसईची फुले विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात दाखल होतात. याठिकाणी सोनचाफा घेणारे व्यापारी ठरलेले आहेत. सध्या बाजारात ५० ते ६० रुपये शेकडाप्रमाणे विकणाऱ्या फुलाला गणपतीत ३०० ते १ हजार रुपये शेकडा प्रमाणे भाव मिळताना दिसतोय.
Join Our WhatsApp Community