गेल्या दोन वर्षांपासून जगभरासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अद्याप कोरोनातून जग पूर्णतः सावरले नसताना जग कोरोनाच्या धास्तीखाली वावरताना दिसत आहे. अशातच आणखी एका नव्या व्हायरसने जगाची धास्ती वाढवली आहे. दक्षिण कोरियामध्ये सध्या नेग्लेरिया फॉऊलेरी म्हणजेच ब्रेन इटिंग अमिबाने (Brain-Eating Amoeba) चिंता वाढवली आहे. या संसर्गाची लागण झालेल्या पहिल्या रूग्णाची नोंद दक्षिण कोरियात करण्यात आली आहे.
कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन एजन्सीने या वृत्ताला दुजोरा दिला असून थायलंडहून परतल्यानंतर मरण पावलेल्या एका कोरियन नागरिकाला नेग्लेरिया फॉऊलेरीची लागण झाल्याची माहितीही कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन एजन्सीने दिली आहे. नेग्लेरिया फॉऊलेरी म्हणजेच ब्रेन इटिंग अमिबा. या आजारातील व्हायरस मानवाच्या मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो. दक्षिणपूर्व आशियाई देशात चार महिने राहिल्यानंतर ५० वर्षीय व्यक्ती १० डिसेंबर रोजी कोरियाला परतला होता. परंतु, परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तिला प्रकृती अस्वास्थामुळे रूग्णालयात दाखल कऱण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर गेल्या आठवड्यात मंगळवारी या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, CBI ची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली)
आहे तरी काय ‘ब्रेन इटिंग अमिबा’?
ब्रेन इटिंग अमिबाचे वैज्ञानिक नाव हे नेग्लेरिया फॉऊलेरी असे आहे. हवामान बदलाच्या संकटामुळे या व्हायरसचा संसर्ग पसरत असल्याचे सांगितले जात आहे. हा घातक अमिबा मानवाच्या थेट मेंदूत शिरकाव करतो आणि मेंदूच्या पेशी कुरतडायला सुरूवात करतो. या अमिबामुळे मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. कोरोनाच्या संकट काळात या अमिबा व्हायरसचा प्रसार हा उत्तर अमेरिकेतील काही राज्यात झाल्याचे दिसून आले होते. ब्रेन इटिंग अमिबा हा पाण्याशी संबंधित असून पाणी हे रोजच्या आपल्या जीवनातील घटक असल्याने त्यापासून दूर राहणे अशक्य आहे. युनायटेड स्टेट्समध्ये १९३७ मध्ये पहिल्यांदा या आजाराची नोंद करण्यात आली होती, ही देशातील पहिली घटना आहे.
Join Our WhatsApp Community