महानगरपालिका मुख्यालय इमारत निळ्या व जांभळ्या रंगाने उजळली

267

मेंदूवर परिणाम करणाऱया हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया (HDSI) या संस्थेच्या विनंतीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजता महानगरपालिका मुख्यालयावर विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका मुख्यालय इमारत निळ्या आणि जांभळ्या रंगानी उजळून निघाली होती.

( हेही वाचा : अखेर निविदेत अडकलेल्या मल जल प्रक्रिया केंद्रांचा मार्ग मोकळा )

‘हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया’

हंटिंग्टन आजार ही असाध्य अनुवांशिक स्थिती आहे. या आजारामुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यातून रुग्णांचे शारीरिक हालचालींवर नियंत्रण नसणे, व्यक्तिमत्वातील असाधारण बदल आणि अपुरी आकलन क्षमता अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात. या आजाराने ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी ‘हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया’ (HDSI) ची स्थापना करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनीही मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. यामध्ये ‘लाईट इट अप फॉर एचडी नावाचा महत्वाचा उपक्रम समाविष्ट आहे. हंटिंग्टन आजाराने बाधित रुग्णांच्या कुटुंबासोबत आपले दृढ ऐक्य दर्शविण्यासाठी आणि वैद्यकीय मंडळी, सामान्य जनता तसेच धोरणकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, मुंबईतील महानगरातील तसेच मुंबई प्रदेशातील प्रमुख इमारतींवर हंटिंग्टन आजारासाठी निर्देशित विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची वेगवेगळ्या दिवशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हंटिंग्टन बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे हितचिंतक आणि तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दरम्यान, चर्चगेट रेल्वे स्थानकावर १२ मे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस इमारतीवर १२ मे, वांद्रे वरळी सागरी सेतूवर १४ मे, ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर १६ मे आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर १८ मे रोजी याप्रमाणे त्या-त्या दिवशी रात्री ८ वाजता विशिष्ट रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती देखील हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडियाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.