संपादकीय
महाराष्ट्रातील महाविजयाबद्दल महायुतीचं (Mahayuti) त्रिवार अभिनंदन!!!
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला सत्तेत आणताना काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेनेला असा काही धडा शिकवला आहे की, पुढची पाच वर्षे इस थप्पड की गूंज सुनाई देनेवाली है… थोडक्यात, सांगायचे तर ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’बरोबरच लाडक्या बहिणींनी दिवाळीत मिळालेल्या ओवाळणीची परतभेट देताना महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आहे आणि गेल्या वेळी मतदारांशी गद्दारी करणाऱ्या खऱ्या गद्दारांना त्यांच्या साथीदारांसह जमिनीवर आणले आहे. (Special Editorial)
(हेही वाचा – बुलडोझर फिरवला, तर मग आम्हाला दोष देऊ नका; Nitesh Rane यांचा व्हिडिओ व्हायरल)
महायुतीला मिळालेल्या २३६ जागा म्हणजे एक प्रकारे राक्षसी (सकारात्मक अर्थाने घ्या) बहुमत आहे. ते इतकं मोठं आहे की, येणाऱ्या विधानसभेत मतदारांनी विरोधी पक्षनेताच ठेवलेला नाही. याचा अर्थ लोकशाही धोक्यात असा न घेता सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास अधिक मोठा आहे, असा घ्यायला हवा. प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी जो प्रखर हिंदुत्वाचा नारा दिलाय, तो आता सत्तेच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी जनतेने त्यांच्या खांद्यावर टाकली आहे, हे लक्षात घ्या. हिंदुत्व केवळ प्रचारापुरते, निवडणुकांपुरते राहिलेले नाही, हेच या मताधिक्यातून जाणवत आहे. आता हिंदुत्वासाठी जी जी आश्वासने दिलीत ती प्रत्यक्षात आणणे भविष्यातील सर्वच निवडणुकांसाठी महत्त्वाची आहेत. (maharashtra vidhan sabha election 2024)
प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाशी संबंधित विहिंपसारख्या संघटनांबरोबरच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सत्तेत यावी, यासाठी तळागाळात प्रचंड कार्य केले आहे, त्याची जाण ठेवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा वापर आता केवळ निवडणुकांपुरता न करता प्रत्यक्षात त्यांच्या देशप्रेमी विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांना बळ देण्याचे कार्य सरकारने अग्रक्रमाने करायला हवे. गेल्या १० वर्षांत जे केले त्यापेक्षाही आता अधिक आक्रमकपणे, गतिशीलतेने ही कामेही व्हायला हवीत. कारण, हिंदुत्व म्हणजेच विकासाचा मार्ग, हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे आता प्रखरपणे ठसवायला हवे.
मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक कामे झटपट निर्णय घेत उबाठाच्या काळातील अडीच वर्षांची शिथिलता संपवली होती. तीच गतिमानता यापुढेही कायम राहायला हवी.
मुंबई-पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
अशा संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकायला हवे. मुंबईतल्या सावरकर स्मारकाने फ्रान्समधील मार्सेलिस (Marseille) येथे स्वातंत्र्यवीरांच्या जगप्रसिद्ध उडीचे एक स्मारक व्हावे, म्हणून गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला आहे. मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु, अज्ञात कारणांमुळे तो दफ्तरबंद होऊन पडलाय. असे अनेक प्रकल्प तत्काळ मार्गी लावत तमाम हिंदुत्ववादी मतदारांना दिलासा देण्याचे कार्य या सरकारने पहिल्या १०० दिवसांतच करायला हवे. कारण, यापुढे सरकारच्या प्रत्येक कृतीवर विरोधकांपेक्षाही जनतेचेच अधिक लक्ष राहणार आहे.
विरोधक का संपवले ?
जाणता राजा, चाणक्य, अमुक पक्षप्रमुख, तमुक युवराज वगैरे उपाध्यांसह वावरणाऱ्यांना जनतेने जो जोर का धक्का दिलाय त्यातून सावरण्यातच यांची हयात संपेल, असे चित्र आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी (NCPSP) तर पार लयास घालवून जनतेने दिलेला मेसेज इतरांनाही अक्कल शिकवणारा आहे. परंतु, उबाठा शिवसेनेचे सैनिक यातून अजून काही शिकवण घेत नसल्याचेच सामनाचे अग्रलेख आणि सकाळचे भोंगे दाखवत आहेत. असो, उबाठाच्या ज्या काही मुंबईतल्या जागा मुस्लिम आणि मनसे (एमएम) फॅक्टरमुळे आल्यात, त्या वजा केल्या तर उबाठाचा आकडाही दहाच्या घरात येईल. तेव्हा, ईव्हीएम वगैरेवर खापर न फोडता आरशात पाहण्याचा प्रयत्न सर्वच विरोधकांनी करायला हवा. हिंदुत्व सोडल्याचे परिणाम काय होतात, हे लक्षात घ्यायला हवं.
मनसेचे भविष्य
अर्थात, नव्याने हिंदुत्ववादी झालेल्या मनसेला भोपळाही फोडता न आल्याने हिंदुत्वाच्या पुरस्कार करण्यावरही तथाकथित फुरोगामी बोटं दाखवतीलच. पण, राज ठाकरेंनाही हीच शिकवण घेणे गरजेचे आहे. हवे तेव्हा हिंदुत्व स्वीकारले, मोठ्या घोषणा देत सभा गाजवल्या म्हणजे कोणीही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही. बाळासाहेबांबद्दल असलेल्या प्रेमापोटीच त्यांच्या पुत्राला मतदारांनी त्यांच्यानंतर इतके दिवस सहन केले. परंतु, जेव्हा उबाठाने हिंदुत्वालाच नख लावत मुस्लिम लांगुलचालनाचा अतिरेक केला, तेव्हा हिंदुत्ववादी मतदार काय करू शकतो, हे दाखवून देण्यातही जनतेने कसर केलेली नाही. राज ठाकरेंच्या धरसोडपणावरही त्यांनी अधिक काम केले आणि हिंदुत्वाची खरेपणाने कास धरली, तर येत्या काळात मनसेचाही नव्याने झालेला भगवा डोमाने डोलताना दिसेल.
गुलाबी रंगही भगवा बनवा…
देवेंद्र फडणवीसांनी प्रचारादरम्यान एका मुलाखतीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, या विधानांवर आक्षेप घेणाऱ्या महायुतीतील भागीदार अजित पवार यांना भगव्या रंगात रंगवण्याची भाषा केली होती. आता येत्या काळात हे बोल खरे ठरवणे गरजेचे आहे. मुस्लिम मतांचं लांगुलचालन बंद करण्याची गरज आहे, हे आता नवाब मलिकांच्या दारुण पराभवाने अजितदादांनाही लक्षात आले असेलच. धार्मिक राजकारण हे नेहमीच मुस्लिमांकडून खेळले गेले आणि एकगठ्ठा मतांच्या जोरावर राजकीय ब्लॅकमेलिंग करण्याचा धंदा आजवर जोमात चालला. याच मतांच्या नादी लागून लोकसभेत काही खासदार जिंकणाऱ्या उबाठाला वक्फ बोर्ड दुरुस्तीच्या विधेयकाबाबत ठाम भूमिका घेता आली नाही म्हणून मातोश्रीवर येऊन गद्दार म्हणण्याची मजल या लोकांची झाली. तेव्हा, आता त्यांचा हा ब्लॅकमेलिंगचा व्होट जिहाद चालणार नाही, हा मेसेज देण्याची गरज होती आणि ती या मतदानातून पूर्ण करण्यात आली आहे.
शेवटी, जाता जाता एकच सांगावेसे वाटते, दणदणीत मताधिक्याने सत्तेत परतलेल्या लाडक्या बनलेल्या महायुतीच्या नेत्यांनो, ओवाळणीच्या परतभेटीमुळे हुरळून जाऊ नका. त्याच लाडक्या बहिणी लव्ह जिहादच्या बळी ठरू नये म्हणून लवकरात लवकर कठोर कायदा करा आणि हिंदुत्वाचा घेतलेला वसा सोडू नका, एवढीच नम्र विनंती! (Special Editorial)
स्वप्नील सावरकर
हेही पहा –
Join Our WhatsApp Community