हत्तींना सांभाळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी बंगालची टीम गडचिरोलीत

छत्तीसगडहून आलेल्या २३ हत्तींच्या कळपाला सांभाळण्यासाठी वनविभागाने पश्चिम बंगालहून हुल्ला टीमला बोलावले आहे. पश्चिम बंगालमध्ये हत्तींसोबत माणसाचा संघर्ष वाढत असल्याने हा गोंधळ कमी करण्यासाठी हुल्ला टीम नियूक्त करण्यात आली आहे. ही हुल्ला टीम गडचिरोली वनविभागाला हुल्ला नियोजनाचे प्रशिक्षण देत आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाची शोधमोहीम; 5 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता जप्त )

गेल्या महिन्यात १२ तारखेला हत्तींचा कळप गडचिरोलीत दाखल झाला. जलसाठे मोठ्या संख्येत असल्याने हत्तींचा कळप गडचिरोलीत चांगलाच स्थिरावला आहे. गडचिरोलीतील तांदूळ आणि बांबू पिके खाण्याकडे हत्तींचा कळप जास्त लक्ष ठेवून आहे. त्यामुळे स्थानिकांना वेळेवर नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन वनविभागाने दिले आहे. गावाजवळ आम्ही बफर क्षेत्र तयार केले आहे. या बफर क्षेत्राच्या आत हत्ती आल्यास त्यांना हुल्ला टीम गावाच्या बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावेल, अशी माहिती गडचिरोली वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक धनंजय वायभसे यांनी दिली.

हुल्ला टीम म्हणजे नक्की

हत्तींना आगीचा धाक दाखवून पळवण्याचे काम करणा-या टीमला पश्चिम बंगालमध्ये हुल्ला टीम असे संबोधले जाते. मशालीसारखी आग हातात घेऊन हत्तींसमोर येऊन त्यांना हुलकावण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण सध्या गडचिरोलीतील वनाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here