राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला असून देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात भक्कम पुरावे, साक्षीदारांच्या जबाबात तफावत आणि देशमुख यांनी मनी लॉड्रिंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, या कारणामुळे न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! दहावीच्या निरोप समारंभातच तिच्यावर आला ‘असा’ प्रसंग… )
मुंबईतील बार मधून महिन्यातून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप प्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांना दिवाळीपूर्वी अटक करण्यात आलेली आहे. देशमुख हे सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असून ईडीने त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र देखील न्यायालयात सादर केले आहे.
जामीन अर्ज फेटाळला
अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका करण्यात यावी यासाठी गेल्या आठवड्यात त्यांच्या वकिलांनी विशेष पीएलएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली आहे. यावेळी न्यायालयाने प्रथमदर्शनी अनिल देशमुखांविरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहे, दुसरे असे की, प्रथमदर्शनी अनिल देशमुखांनी मनी लॉड्रिंग केल्याचं दिसून येत आहे आणि सेक्शन ४५ नुसार साक्षीदारांच्या जबाबात तफावत असली तरी याक्षणी न्यायालय ते तपासू शकत नाही हे कारण देऊन न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
Join Our WhatsApp Community