स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रभक्ती समिती यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय  स्मारक आणि राष्ट्रभक्ती समिती यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी सकाळी ९ वाजता स्वातंत्र्यदिन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप कॅप्टन निलेश देखणे उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी उद्यान, दादर, मुंबई येथे हा सोहळा होणार आहे.

ग्रुप कॅप्टन निलेश देखणे, दिग्पाल लांजेकर आणि तुषार दळवी यांची विशेष उपस्थिती

दादर परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी राष्ट्रभक्ती समिती स्थापन केली असून वीर सावरकर स्मारक त्यांचे नेतृत्व करीत आहे. २०१६ पासून अशा प्रकारे स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी सकाळी ९ वाजता ग्रुप कॅप्टन निलेश देखणे यांच्याहस्ते ध्वजारोहण केल्यानंतर मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे  शिवाजी उद्यान परिसरात संचलन होईल.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबीर )

त्याचप्रमाणे या भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त सकाळी १० ते ११ या दरम्यान एक खास कार्यक्रमही सादर होणार आहे, यात आपल्या क्रांतिकारकांनी घडवलेल्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाची साक्ष देणारी गाणी, नृत्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगांचे अभिवाचन होणार आहे. यात श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, केतकी भावे- जोशी, गुरुराज कोरगावकर, दिशा देसाई, पूर्वी भावे, कलांगणचे विद्यार्थी सहभागी असतील. याशिवाय मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची साहसी प्रात्यक्षिकेही सादर होतील. यावेळी दिग्पाल लांजेकर आणि तुषार दळवी यांचा विशेष सहभाग असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here