मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस / दादर – सावंतवाडी रोडदरम्यान आंगणेवाडी जत्रा आणि होळी दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १० विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत
अ) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष (२)
- ट्रेन क्रमांक 01161 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दि. २३.२.२०२२ रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01162 विशेष सावंतवाडी रोडवरून दि. २४.२.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
- थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
- संरचना : १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि ५ द्वितीय आसन श्रेणी.
(हेही वाचा –रविवारी बाहेर जाताय? ‘या’ हार्बर मार्गावर असणार मेगा ब्लॉक)
ब) दादर-सावंतवाडी रोड विशेष (८)
- गाडी क्रमांक 01163 विशेष दादर दि. १६.३.२०२२ ते १९.३.२०२२ पर्यंत दररोज १२.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01164 विशेष गाडी दि. १७.३.२०२२ ते २०.३.२०२२ पर्यंत दररोज २३.५० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दादरला दुसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल.
- थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ..
- संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.
- आरक्षण : 01161/01162 आणि 01163/01164 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ५.२.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.
Join Our WhatsApp Community