चष्मा तयार करण्याच्या दुकानांना सध्या तरी परवाना काढावा लागणार नाही. मात्र, नजिकच्या काळात त्याची नोंदणी करावी लागेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) देण्यात आली.
(हेही वाचा – स्टीलच्या ग्लासात १६ वर्षीय मुलाने लावला सुतळी बॉम्ब अन्…)
मोजमापासाठी वापरल्या न जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनांसाठी ‘एफडीए’चा परवाना घेण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी कायद्यात सुधारणाही करण्यात आली. पण, याबाबत वेगवेगळ्या उत्पादकांच्या संघटनांनी आपली बाजू केंद्र सरकारकडे मांडली. त्यामुळे या कायद्यातून काही घटकांना वगळ्यात आले. त्यात चष्म्याचा समावेश असल्याचे ‘एफडीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, काँटेक्ट लेन्ससाठी नोंदणी करण्याची आवश्यकता असल्याचे यापूर्वीच केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सध्या फक्त चष्म्यासाठी परवान्याची गरज नाही. पण, लेन्ससाठी ही नोंदणी आवश्यक ठरेल. मात्र, केंद्र सरकारने भविष्यात कायद्यात सुधारणा केल्यास चष्म्यासाठी ही परवानगी घ्यावी लागेल, असेही अधोरेखित करण्यात आले.
२७ उत्पादकांना परवाने
केंद्राने वैद्यकीय वापरात्या घटकांची ए, बी, सी आणि डी अशा चार गटात वर्गवारी केली आहे. या वर्गवारीनुसार, ए आणि बी वर्गातील उत्पादकांना राज्य सरकार परवाना देणार असून सी आणि डी प्रकरातील उत्पादकांना केंद्र परवाना देणार अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार एफडीए च्या पुणे विभागाने आतापर्यंत २७ उत्पादकांना परवाने दिल्याचे सांगितले जात आहे,
Join Our WhatsApp Community