Spicejet सिस्टमवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला, उड्डाणं खोळंबली

159

स्पाईसजेट या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बुधवारी मोठा खोळंबा झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट या विमान कंपनीच्या सिस्टीमवर रॅन्समवेअरचा हल्ला झाला. त्यामुळे बुधवारी सकाळच्या विमान उड्डाणांवर परिणाम झाल्याने बरीच उड्डाणं खोळंबळी. स्पाईसजेटने यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. काही वेळातच या कंपनीच्या तंत्रज्ञांनी ही सिस्टीम सुरळीत केल्याचे देखील सांगितले जात आहे.

काही स्पाईसजेट सिस्टीमना मंगळवारी रात्री रॅन्समवेअर या सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला. ज्यामुळे बुधवारी सकाळच्या फ्लाइट निर्गमनांवर परिणाम झाला आणि उड्डाणांची सेवा मंदावली. आमच्या IT टीमने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि ती सुधारली असून आता उड्डाणे सामान्यपणे सुरू आहेत, अशी माहिती स्पाईसजेटने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या ग्राहकांना दिली आहे.

(हेही वाचा – ई-बस निविदेप्रकरणी TATA पॉवरची याचिका फेटाळावी, BEST ची उच्च न्यायालयाला विनंती)

रॅन्समवेअर म्हणजे काय?

रॅन्समवेअर हा एकप्रकारे सायबर हल्ला असतो. रॅन्समवेअरच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर्स व्हायरस कम्प्युटरमध्ये सोडतात. ज्याद्वारे कंम्प्युटरवरचा डाटा वापरताच येत नाही. कंम्प्युटरच्या स्क्रिनवर एक लिंक दिसते. कंम्प्युटर वापरायचा असेल तर त्यावर क्लिक करावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला समोरून मागितले जातील तेवढे पैसे देणे भाग पडते. किंवा हे गुन्हेगार तुमचा सगळा डाटा हॅक करून इनक्रिप्ट करतात. अशा प्रकारचा हल्ला करणे ही गंभीर बाब असून यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.