SpiceJet ची टॅक्सी सर्व्हिस लाँच! विमानतळावर पोहोचणं होणार सोपं

152

बजेट एअरलाइन स्पाईसजेटने प्रवाशांच्या सोयीसाठी स्पाइसजेट टॅक्सी सेवा सुरू केली आहे. या टॅक्सीचे कॅन्सलेशन फीस शून्य ठेवण्यात आले आहे, याशिवाय वेटिंग टाईमही शून्य असणार आहे. ही सुविधा देशातील सर्व प्रमुख विमानतळ आणि दुबईमध्ये उपलब्ध असणार आहे. ही कॅब सेवा एंड-टू-एंड उपलब्ध असणार असून विमानतळावर पोहोचण्यासाठी घरातून पिक-अप आणि विमानतळावर पोहोचल्यावर घरी सोडण्यासाठी दोन्ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

(हेही वाचा – आता विमानात दिसणार ‘तृतीयपंथी’ वैमानिक! DGCA ने जारी केली नवी गाईडलाईन, ‘या’ आहेत अटी)

स्पाइसजेटने शेअर केलेल्या माहितीनुसार, 28 प्रमुख विमानतळांवर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. 12 ऑगस्टपासून पहिल्या टप्प्यात दिल्ली विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवीन सेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये दुबई विमानतळाचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या ही सुविधा दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, वाराणसी, अमृतसर, जयपूर, अहमदाबाद, कोची, पुणे, तिरुपती, डेहराडून, पोर्ट ब्लेअर आणि दुबई येथे सुरू करण्यात आली आहे. स्पाईसजेट टॅक्सी सेवेचा लाभ घेतल्यानंतर प्रवाशांना झटपट कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे.

इन-फ्लाइट कॅब बुकिंगची सुविधा आधीच उपलब्ध

स्पाईसजेट आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच सक्रिय असते. प्रवासी आधीच इन-फ्लाइट कॅब बुकिंगचा लाभ घेत आहेत. याअंतर्गत स्पाईसस्क्रीनच्या मदतीने प्रवासी हवेत सफर करताना स्वतःसाठी टॅक्सी किंवा कॅब बुक करू शकतात. स्पाइसजेटच्या टॅक्सी सेवेच्या मदतीने प्रवाशांच्या सोयी आणखी वाढणार आहेत. स्पाईसजेटचे चीफ बिझनेस ऑफिसर डेबोजो महर्षी यांनी सांगितले की, या एंड-टू-एंड सर्व्हिसमुळे आमच्या एअरलाइन्सवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होईल. प्रवाशांना घरातून विमानतळावर पोहोचण्यासाठी किंवा विमानतळावरून घरी पोहोचण्यासाठी ही कॅब बुक करताना कोणतीही अडचण येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

SMS द्वारे मिळणार टॅक्सी सर्व्हिसचे डिटेल्स

जेव्हा एखादा प्रवासी स्पाईसजेट विमानाचे तिकीट बुक करतो, तेव्हा त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक एसएमएस पाठवला जाईल, त्यामध्ये एक लिंक असेल. ही लिंक स्पाइसजेट टॅक्सी सर्व्हिससाठी असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रवाशाला आपले डिटेल्स अपडेट करावे लागतील. यादरम्यान, पिकअपचे ठिकाण आणि पिकअपची वेळ यासारखी माहिती मागवली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निश्चित वेळेवर तुम्हाला एक सॅनिटाइज्ड कॅब उपलब्ध होईल. घरातून पिकअप करणे आणि एअरपोर्टवरून घरी ड्राप करणे, अशा दोन्ही बाबतीत याचा लाभ घेता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.