धडाम! विजेच्या खांबाला धडकलं विमान अन्…

141

दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले आणि दुर्घटना घडली. विमानाच्या पुश बॅकदरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर पुश बॅकदरम्यान ही घटना घडली असून हे विमान टर्मिनलवरून धावपट्टीवर नेण्यात येत होते. विमान दिल्लीतून जम्मू येथे जाण्यासाठी उड्डाण घेणार होते. सुदैवाने अपघात झाला तेव्हा विमानात एकही प्रवासी नव्हता. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने दुसऱ्या विमानाची व्यवस्था करत त्यातून प्रवाशांना रवाना करण्यात आले.

पुश बॅकदरम्यान झाला अपघात

स्पाइसजेट कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, एसजी १६० हे विमान दिल्ली येथून जम्मूला जाणार होते. मात्र पुश बॅकवेळी विमानाचा उजव्या बाजूचा पंख विजेच्या खांबाला धडकले. यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. धडक जोरात बसल्याने खांबही वाकला असल्याचे सांगण्यात आले.

(हेही वाचा – बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत तुंबळ हाणामारी!)

या प्रकरणाची चौकशी सुरू

दरम्यान, या अपघाताची दिल्ली विमानतळ प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दिल्लीहून सकाळी ९.२० वाजता निघणार होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.