- ऋजुता लुकतुके
स्पाईसजेट कंपनी पुढील वर्षी विमानसेवेच्या विस्तारासाठी २७० कोटी रुपये उभे करणार आहे. (SpiceJet to Bid For GoFirst)
स्पाईसजेट कंपनीने सध्या बंद असलेल्या गोफर्स्ट विमान कंपनीला विकत घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं जाहीर केलं आहे. गोफर्स्ट विमान कंपनीची मालमत्ता ताफ्यात जमा झाली तर स्पाईसजेटची विमान उड्डाण क्षेत्रातील ताकद आणखी वाढेल असं कंपनीला वाटतं. (SpiceJet to Bid For GoFirst)
स्पाईसजेट कंपनीने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार, विमानसेवेचा विस्तार आणि अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी २७० दशलक्ष अमेरिकन डॉलरचं भांडवल उभारण्याचा कंपनीचा विचार आहे आणि त्यासाठी कंपनीमध्ये विचार सुरू आहे. (SpiceJet to Bid For GoFirst)
You are the reason our skies are so special.#flyspicejet #spicejet #customerlove #Travel #travelgram #Aviation #travelwithus #tweets #appreciations #addspicetoyourtravel pic.twitter.com/y84twEpdGL
— SpiceJet (@flyspicejet) December 18, 2023
(हेही वाचा – Former US President Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, कारण…जाणून घ्या)
कंपनी उभारणार असलेलं भांडवल हे समभागांची विक्री आणि वॉरंटी विक्रीतून येईल असा अंदाज आहे. स्पाईसजेटने याविषयी आणखी काही स्पष्टता दिलेली नाही. गो एअरवेज कंपनीची विमानं सध्या जमिनीवरच आहेत आणि बँक ऑफ बरोदा, डेव्हलपमेंट बँक आणि डॉईचं बँक यांचं मिळून ६५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास कर्ज आहे. (SpiceJet to Bid For GoFirst)
या तीन बँकांनीच कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली. थोडक्यात गो एअरवेज खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेची तयारी ठेवावी लागणार आहे. (SpiceJet to Bid For GoFirst)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community