SpiceJet चं तिकीट महागणार; विमान कंपन्या 15% भाडं वाढवण्याच्या तयारीत

101

विमान प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. एव्हिएशन फ्युएलच्या (एटीएफ) वाढत्या किमती आणि रुपयाचे घसरलेले मूल्य यामुळे विमान तिकीट महाग होणार आहे. स्पाईसजेटचे चेअरमन आणि एमडी अजय सिंग यांनी सांगितले की, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमती वाढल्याने आमच्याकडे फ्लाइट तिकिटांचे भाडे वाढवण्याशिवाय पर्याय उरला नाही.

(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)

तसेच विमान ऑपरेशनचा खर्च अधिक चांगला ठेवण्यासाठी हवाई भाड्यात किमान 10-15 टक्के वाढ करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, जून 2021 पासून एटीएफच्या किमती 120 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. ही वाढ शाश्वत नाही आणि एटीएफवरील कर कमी करण्यासाठी सरकार, केंद्र आणि राज्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

रुपया-डॉलरचा प्रभाव

स्पाइसजेटने गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या किमतीतील या वाढीचा जास्तीत जास्त भार उचलण्याचा प्रयत्न केला आहे, जो आमच्या ऑपरेशन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमकुवतपणाचा एअरलाइन्सवर आणखी परिणाम झाला आहे, कारण आमच्याकडे मोठ्या प्रमाणात खर्च असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एटीएफच्या दरात पुन्हा वाढ

एटीएफच्या किमती पुन्हा एकदा 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत, त्यानंतर एटीएफच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आजपासून एटीएफची किंमत 19757.13 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 141232.87 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. तर 1 जून रोजी एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत सुमारे 1.3 टक्के दिलासा देण्यात आला होता. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दिल्लीमध्ये एटीएफच्या किमती 1,563.97 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 1 जून रोजी दिल्लीत जेट इंधनाची किंमत 121,475.74 रुपये प्रति किलोलीटर होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.