बस आदळली अन् तुटला मणका! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

131

पुण्यात एक पीएमपी बस चालकाला बस भरधाव वेगाने चालवणं चांगलंच महागात पडलं आहे. नेहमीच्या रस्त्यावरील गतिरोधक असल्याचे माहित असूनही चालकाने भरधाव बस नेली. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्यास जबर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपी बस जोरात आदळल्याने बसमधील एका प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला आहे. या घटनेनंतर त्या प्रवाशानं थेट पोलिस स्टेशन गाठले आणि त्या चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला प्रकार

ही घटना २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कात्रज रस्त्यावरील सर्पोद्यान समोर घडली. या घटनेत अस्लम कादर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी राजू मोतीराम चिंचवडकर (वय ६२, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.

(हेही वाचा – नवा रेकॉर्ड! देशात निम्मी लोकसंख्या कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसवंत)

गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिंचवडकर हे २७ नोव्हेंबर रोजीलोहगाव ते कात्रज मार्गावरील बसमधून प्रवास करीत होते. सायंकाळी बस सातारा रस्त्यावरील कात्रज रस्त्यावरून सर्पोद्यान समोरुन जात होती. त्यावेळी तेथे गतिरोधक असल्याचे माहित असूनही चालक शेख याने बसचा ब्रेक लावला नाही. भरधाव बस गतिरोधकावरुन जाताना जोरात आदळली. यामध्ये चिंचवडकर हे सीटवरून खाली पडल्याने त्यांच्या मणक्याला जबर मार बसला. ते डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या मणक्यात अंतर पडल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.