स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती (World Modi Lipi Prasar Samiti) यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०२४ या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ आणि ‘शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ घेण्यात आल्या. महाराष्ट्राच्या ५ शहरांमध्ये मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे एकाच दिवशी आणि एकाच वेळी या ५ स्पर्धा घेतल्या गेल्या. मोडी लिपी प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्पर्धांचे हे आठवे वर्ष होते. (Modi Script Competition)
(हेही वाचा – Lok Sabha Results : मालेगाव मध्य : हा घ्या मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा ढळढळीत पुरावा)
या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या वतीने मोडीविषयक आणि ऐतिहासिक पुस्तके आणि सावरकर साहित्य पारितोषिक म्हणून देण्यात आले. ही स्पर्धा महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात पोहोचवण्यासह इंदूर, बडोदा, बेळगाव, तंजावूर या मराठी भाषिक अधिक प्रमाणात आहेत, अशा भागांतही पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. वर्षागणिक या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे, अशा भावना आयोजक राजेश खिलारी यांनी व्यक्त केल्या.
‘सुंदर हस्ताक्षर’ स्पर्धेतील विजेते
मुंबई केंद्र
भाऊराव घाडीगावकर यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे, द्वितीय पारितोषिक प्रकाश डुंबरे यांना, तर किशोर सावंत यांना मिळाले आहे.
पुणे केंद्र
राहुल सारडा यांनी प्रथम, सुनीत जोशी यांनी द्वितीय, तर रूपाली प्रभुणे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
नाशिक केंद्र
प्रथम क्रमांक धीरज जाधव यांनी, द्वितीय क्रमांक सुधीर जोशी यांनी, तर तृतीय क्रमांक कविता जगताप यांनी पटकावला आहे.
नगर केंद्र
येथे प्रथम क्रमांक डॉ. वर्षा कोर्टीकर यांनी, द्वितीय क्रमांक भारत पडवळ, तर हरिचंदर लोखंडे यांनी पटकावला आहे.
कोल्हापूर केंद्र
प्रथम क्रमांक सौ. स्नेहा कानिटकर यांनी, द्वितीय क्रमांक मृणाल देगावकर आणि तृतीय क्रमांक संयुक्ता कराडे यांनी पटकावला आहे.
‘शीघ्र लिप्यंतर’ स्पर्धेचे विजेते
मुंबई केंद्र
या स्पर्धेत प्रथम क्रमांक भाऊराव घाडीगावकर यांनी, द्वितीय क्रमांक श्रद्धा कानडे यांनी, तर तृतीय क्रमांक अनिल धुरी यांनी प्राप्त केला आहे.
पुणे केंद्र
प्रथम क्रमांक र.वि. जोशी यांनी, द्वितीय क्रमांक रूपाली प्रभुणे यांनी, तर तृतीय क्रमांक राहुल सारडा यांनी पटकावला आहे.
नाशिक केंद्र
प्रथम क्रमांक धीरज जाधव यांनी, तर द्वितीय क्रमांक सुधीर जोशी यांनी पटकावला आहे.
नगर केंद्र
येथे प्रथम क्रमांक भारत पडवळ यांनी, तर द्वितीय क्रमांक हरिचंदर लोखंडे यांनी, तर तृतीय क्रमांक रामदास ससे यांनी पटकावला आहे.
कोल्हापूर केंद्र
येथे प्रथम क्रमांक नारायण देशमुख यांनी, द्वितीय क्रमांक मृणाल देगावकर यांनी, तर तृतीय क्रमांक कविता पवार यांनी पटकावला आहे. (Modi Script Competition)
Join Our WhatsApp Community