अखेर श्रीलंकेने स्वत:लाच जाहीर केले दिवाळखोर!

५१ हजार कोटी डॉलर्सचे विदेशी कर्ज परतफेडीस असमर्थ

135

श्रीलंकेत अभूतपूर्व आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यानंतर आता आपल्यावर असलेले ५१ हजार कोटी डॉलर्सचे विदेशी कर्ज परत करू शकत नाही. यामागे देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) बेलआउट पॅकेज मिळू शकलेले नाही हे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. श्रीलंकेचे ट्रेझरी सेक्रेटरी महिंद्रा सिरिवर्धने यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे. त्यामुळे एकप्रकारे श्रीलंकेने स्वत:ला दिवाळखोर जाहीर केले आहे.

श्रीलंकेने काय म्हटले?

श्रीलंकेने म्हटले आहे की, एप्रिल २०२१ मध्ये श्रीलंकेवर एकूण ३,५०० दशलक्ष डॉलरचे कर्ज होते. पण, एकाच वर्षात हे कर्ज ५,१०० दशलक्ष डॉलरवर पोहोचले आहे. म्हणजे वर्षभरात तब्बल १,६०० दशलक्ष डॉलर इतकी वाढ झाली आहे. श्रीलंकेने आतापर्यंतच्या कर्जाची परतफेड केली नाही. सध्या त्यांच्यावर आर्थिक संकट आहे. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदेशी कर्जाची परतफेड करू शकणार नसल्याचेही जाहीर केले आहे. आमच्यावर कर्ज असणारे इतर देश त्यांच्या कर्जावर व्याज आकारू शकतात आणि तसेच त्या कर्जाची रक्कम श्रीलंकन रुपयामध्ये मागू शकतात. आम्ही परकीय चलनामध्ये कर्ज फेडण्यास असमर्थ आहोत, असे श्रीलंकेच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

(हेही वाचा – मोदी-बायडेन यांच्यात चर्चा: चीनच्या आक्रमकतेवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मोठे वक्तव्य)

श्रीलंकेवर एकूण ५१ अब्ज डॉलरचं कर्ज असून हे कर्ज न फेडून कर्जबुडवे बनण्याचा शेवटचा पर्याय आमच्याजवळ उरलेला  आहे. आमचा देश प्रचंड संकटात आहे. लोकांना खायला अन्न मिळत नाही. त्यामुळे इतर देशांनी समजून घ्यावे. श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर नंदलाल वीरासिंघे यांनी म्हटले आहे की, सध्या उपलब्ध असलेल्या भांडवलाचा वापर आवश्यक वस्तू आयात करण्यासाठी केला जाईल.

कोणाचे किती कर्ज?

श्रीलंकेवर जे कर्ज आहे, त्यातील ४७ टक्के कर्ज आंतरराष्ट्रीय बाजारातून घेतले आहे. यानंतर १५ टक्के कर्ज चीनचे, १३ टक्के एशियन डेव्हलपमेंट बँकेचे, १० टक्के जागतिक बँकेचे, १० टक्के जपानचे, २ टक्के भारताचे आणि ३ टक्के इतर ठिकाणचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.