श्रीमद्‍भगवद्‍गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा…

105

मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवलं आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की श्रीमद्भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावा. हे पत्र ५ जुलै रोजी पाठवण्यात आलं होतं. १८ जुलैला गृहमंत्री अमित शाह यांनी या पत्राला उत्तर दिलं. अवर सचिव (समन्वय – १) रेनू सूरी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. याविषयावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित मंत्रालयाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

( हेही वाचा : MNS News : अनंत चतुर्दशीनंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी अमित ठाकरेंची विशेष मोहीम!)

त्यामुळे कदाचित लवकरच श्रीमद्भगवद्गीता हा आपला राष्ट्रीय ग्रंथ होणार आहे. आता जसजसा हा मुद्दा पुढे येत जाईल त्यावर वाद होत राहिल. श्रीमद्भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ होऊ नये यासाठी रान उठवलं जाईल. कसा हिंदू अजेंडा राबवला जात आहे यावर आकांत केला जाईल. पुन्हा आझादी आझादी च्या घोषणा दिल्या जातील.

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रीय ग्रंथ होण्यासाठी श्रीमद्भगवद्गीता यासारखा दुसरा सेक्युलर ग्रंथ नाही. कारण सर्व समाजाचं हित साधणारा हा ग्रंथ नाही. हा केवळ हिंदुंचा ग्रंथ नाही तर हा वैश्विक ग्रंथ आहे. आपले अनेक क्रांतिकारक हा ग्रंथ हातात धरुन फासावर गेले आहेत. अगदी परदेशातल्या लोकांनाही या ग्रंथाबद्दल प्रचंड आदर वाटतो. याचं कारण हेच की, त्यांना जे ‘रिलिजियस’ अपेक्षित आहे, तसं रिलिजन या ग्रंथात नाही.

या ग्रंथात हिंदू होण्याचा अट्टाहास नाही. रिलिजियस होण्याची बळजबरी नाही. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला आहात, तर तो धर्म पाळत कर्म करत तुम्हाला वाटचाल करायची आहे. भगवान श्रीकृष्ण मानवजातीचं तत्वज्ञान सांगतात. म्हणूनच तर कोणतीही बळजबरी न करता, बंदूक किंवा तलवारीचा धाक न दाखवता, कोणतंही आमीष न देता जगात पूज्य असलेला एकमेव ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद्भगवद्गीता … त्यामुळे हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित झाला पाहिजे. भविष्यात तो वैश्विक ग्रंथ म्हणून घोषित होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.