…म्हणून शहरातील पालक SSC बोर्डाकडे फिरवतात पाठ!

103

प्रत्येक पालकाचे आपला पाल्य चांगल्या शाळेत जावा, उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे असे स्वप्न असते. सध्या आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी बोर्ड, आयजी, आईसीएसई, सीबीएसई बोर्ड प्रचलित आहेत. परंतु अलिकडे पालक एसएससी बोर्डाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. एवढेच काय तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सुद्धा नावे बदलून इतर बोर्डात रूपांतरित होत आहेत.

( हेही वाचा : आता रेल्वे प्रवासात जेवणाचे नो टेन्शन! २ एप्रिलपासून ही सुविधा सुरू )

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे आयुष्य सीबीएसई (CBSE) किंवा आईसीएसई (ICSE) शाळेत उत्तमरित्या घडेल असे वाटते. पालकांच्या याच मानसिकतेमुळे राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळा आता इतर बोर्डाला संलग्न होत आहे. बारावीनंतर जेईई, नीट, युपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांचा पाया सीबीएसई किंवा आईसीएसई बोर्डमध्ये पक्का होतो अशी पालकांची धारणा झालेली आहे.

सीबीएसई- आईसीएसई बोर्ड शिक्षण पद्धती

सीबीएसई-आयसीएसई बोर्डांमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणपद्धतीवर अधिक भर दिला जातो. तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या तुलनेत या दोन्ही बोर्डांचा अभ्यास २ ते ३ इयत्तांनी पुढे असतो. यामुळेच या बोर्डातील विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षा देताना अडचण येत नाही. म्हणून पालक पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी एसएससी बोर्डाव्यतिरिक्त या इतर बोर्डांना पसंती देतात. सीबीएससीच्या नियमानुसार एका वर्गात विद्यार्थीसंख्या ४० असते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष दिले जाते, अशी पालकांची धारणा आहे. सीबीएससी बोर्ड आठवीनंतर मुलांसाठी खूप पर्याय ठेवते त्यामुळे मुलांना त्याच्या आवडीप्रमाणे विषय निवडता येतात. त्यामुळे त्यांना शिक्षणप्रणालीविषयी भरवसा वाटतो नव्या युगातील पालक शाळेतील पायाभूत सुविधांना प्राधान्य देतात.

मुंबईतून एसएससी बोर्ड होत आहे नामशेष

मुंबई महानगरपालिकेने सुद्धा या इतर बोर्डांकडे वाढता कल पाहून सन २०२१-२२मध्ये सीबीएसईच्या १० शाळा सुरू केल्या. या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत असून, चार हजार जागांसाठी सुमारे दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते. या शाळांना मिळत असलेल्या प्रतिसादानंतर महापालिकेने केंब्रिज मंडळाशी संलग्नता असणारी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. माटुंगा पूर्व येथील एल.के.वागजी महापालिका शाळेत केंब्रिज बोर्डाची शाळा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हळूहळू मुंबईतून एसएससी बोर्ड नामशेष होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.