महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६ आहे. तर मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे.
राज्यात इयत्ता बारावीनंतर दहावीतही कोकणचा निकाल सर्वाधिक निकाल लागला आहे. २०२० च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
राज्यात कोकण पहिला तर नाशिक विभाग शेवटी
- पुणे: ९६.१६
- नागपूर: ९७.००
- औरंगाबाद: ९६.३३
- मुंबई: ९६.९४
- कोल्हापूर: ९८.५०
- अमरावती: ९६.८१
- नाशिक: ९५.९०
- लातूर: ९७.२७
- कोकण: ९९.२७
कुठे पाहता येणार निकाल? या आहेत लिंक…
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये १,४४९,६६० विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांना नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. मंडळाकडून २० जूनपर्यंत निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता १७ जूनला दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल.