रिया चक्रवर्तीने गांजा खरेदी करुन सुशांतला दिला, NCB चा मोठा खुलासा

171

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठा खुलासा केला आहे. एनसीबीने असा दावा केला की, सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविकसह इतर आरोपींकडून अनेकदा गांजा विकत घेत होती आणि तो अभिनेता सुशांत सिंगला द्यायची. NCB ने अलीकडेच NDPS न्यायालयात सुशांत मृत्यू प्रकरणी 35 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, ज्याची मंगळवारी सुनावणी झाली.

(हेही वाचा – Coal Scam Case: ED ची मोठी कारवाई, आरोपींची 25 कोटींची संपत्ती जप्त)

सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आपला भाऊ शौविक आणि अन्य आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी केला आणि सुशांतला दिला होता. रिया चक्रवर्ती, शौविक यांच्यासह सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एकत्र मिळून एक षडयंत्र रचले होते, जेणेकरून ते बॉलिवूड आणि हाय सोसायटीमध्ये ड्रग्जचे वितरण, विक्री आणि खरेदी करू शकतील, असेही मंगळवारी एनसीबीने उघड केले.

एनसीबीने मंगळवारी दावा केला की, आरोपींनी केवळ मुंबईतच अंमली पदार्थांची तस्करी केली नाही तर गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचा वापर केला. या बेकायदेशीर तस्करी आणि गुन्हेगार आरोपींविरुद्ध कलम 27 आणि 27 अ लागू करण्यात आले आहे. याशिवाय कलम 28 आणि कलम 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असेही सांगितले जात आहे की, NDPS अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 जुलै ही तारीख दिली आहे. यानंतर पुढची सुनावणी 15 दिवसांनंतर होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.