अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू

151

अमेरिकेतील सेंट ल्युईस हायस्कूलमध्ये एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या प्रत्युतरात हल्लेखोर ठार झाला आहे.

(हेही वाचा – Diwali 2022: दिवाळीच्या फटाक्यांमुळे ‘हे’ शहर ठरले जगातले सर्वात प्रदूषित शहर)

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स हायस्कूलमध्ये हल्लेखोराने अचानक घुसून गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबारानंतर शाळेत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले.

पोलिसांना माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोघांमध्ये झालेल्या चकमकीत हल्लेखोराला ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले. हल्लेखोर कोण होता? हल्लेखोराकडे बंदूक कशी आली? तसेच तो शाळेत कसा गेला? याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच हल्ल्यामागील कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.