ऋजुता लुकतुके
स्टेट बँकेचा (State Bank) २०२३-२४ साठीचा तिमाही ताळेबंद प्रसिद्ध झाला. त्यातून एका मागून एक गोष्टी समोर येत आहेत. पहिल्या तिमाहीतल्या निव्वळ नफ्याच्या जोरावर कंपनीने रिलायन्स या देशातील अग्रगण्य कॉर्पोरेट कंपनीलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे स्टेट बँक ही नफ्याच्या निकषावर देशातली सगळ्यात मोठी कंपनी ठरली आहे. यंदाच्या तिमाहीत स्टेट बँकेचा निव्वळ नफा होता १८,५३७ कोटी रुपये. तर रिलायन्स कंपनीचा निव्वळ नफा आहे १६,०११ कोटी रुपये.
रिलायन्स मागची दहा वर्षं देशातील सर्वाधिक नफा नोंदवणारी कंपनी होती. हा विक्रम या तिमाहीसाठी तरी मोडीत निघालाय. ही कामगिरी देशातील सगळ्यात मोठ्या सार्वजनिक (State Bank) बँकेनं केली आहे.
यापूर्वी स्टेट बँकेनंच २०११-१२ या आर्थिक वर्षात रिलायन्सला असंच मागे टाकलं होतं.
एरवी रिलायन्सचा मुख्य बिझिनेस तेल व नैसर्गिक वायूच्या शुद्धीकरणाचा आहे. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर नफ्याच्या गणितात रिलायन्सची स्पर्धा इतकी वर्षं देशातील तेल कंपन्यांशीच होती. ONGC, Oil इंडिया या (State Bank) कंपन्यांनी यापूर्वी रिलायन्सला मागे टाकलेलं आहे. पण, मागची तब्बल दहा वर्षं रिलायन्सने देशातील सर्वात नफ्यात असलेली कंपनी हा लौकीक टिकवलेला होता.
(हेही वाचा – Manoj Tiwary : माजी कसोटीपटू मनोज तिवारीने निवृत्ती का मागे घेतली?)
रिलायन्स कंपनीने अलीकडे रिटेल तसंच दूरसंचार क्षेत्रात मोठा विस्तार केला आहे. पण, मुख्य तेल शुद्धीकरण उद्योगात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी होत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे नफ्याचं (State Bank) प्रमाण कमी होत आहे. त्याचाच फटका कंपनीला बसलाय.
याउलट स्टेट बँकेची (State Bank) कामगिरी कर्ज देणं आणि त्यांची वसुली या दोन्हीत चांगली आहे. शिवाय मुदतठेवींवरील व्याजदर वाढल्यामुळे तिथेही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी याच तिमाहीच्या तुलनेत यंदा बँकेचा नफा १५३ टक्क्यांनी वाढला आहे.
२०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत स्टेट बँक (State Bank) तोटाच नोंदवत होती. बँकेच्या शेअरवरही त्याचा परिणाम झाला होता. पण, त्यानंतर बँकिंग सेवा, इन्शुरन्स, आणि डीमार्ट या क्षेत्रात बँकेनं केलेला विस्तार लाभदायी ठरलाय. तसंच थकित कर्जांच्या बाबतीत घेतलेलं धोरणही आकड्यांमध्ये परावर्तित झालेलं दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community