मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढविण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेत वाढ करण्यात आली आहे. यानुसार, प्रभाग रचनेत ९ प्रभागांची वाढ करण्यात आल्याने २२७ वरून २३६ अशी प्रभागाची संख्या आता होणार आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेत आता २२७ ऐवजी २३६ नगरसेवक असतील. यासंदर्भातील फेररचनेचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

जनगणनेच्या आधारावर प्रभागांची निश्चिती

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांची वाढती लक्षात घेता हे प्रभाग वाढविण्यात आले आहे. यासंदर्भातील कामकाज मुंबई महानगरपालिका करणार आहे. तसेच दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित केली जाते. महापालिकांची सध्याची नगरसेवकांची संख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

दरम्यान, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत. असेही सांगितले जातेय की, नगरसेवकांची संख्या वाढवताना राजकीय फायदा आणि त्याची गणितही डोळ्यासमोर ठेवले जाते. त्यामुळे मुंबईतील नगरसेवक संख्या वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे तर निवडणूकीला घाबरले..

मुंबई नगरपालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली आहे. फक्त नऊच सदस्य का वाढले ? याला लोकसंख्येचा काय आधार आहे ? जनगणनेचा आधार काय ? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ यांनी केला आहे. केवळ राजकीय सोयीसाठी तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नगरसेवकांची संख्या बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेनेने घेतला आहे. मंत्रिमंडळात मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय यापूर्वीही झाला असता सर्व महापालिकांमध्ये १५ टक्के जागा वाढवल्या त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत जागा वाढल्या नाहीत. आता त्यांच्या लक्षात आलं प्रभाग रचनेत गडबड करून आपण ही निवडणूक जिंकू का? तर तो डाव यशस्वी होणार नाही हे लक्षात आल्यावर आता, प्रभागांची संख्याच नऊने वाढवावी, म्हणजे प्रभागाची पूर्ण फेररचना करायला आपल्याला मोकळं रान मिळेल. केवळ राजकीय हेतूने नऊची संख्या वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने आणि शिवसेनेने घेतलेला आहे. हे निवडणूकीला घाबरलेले आहेत, असा आरोप शिरसाठांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here