मंगळवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्यावर पोहोचली आहे. राज्यात २ हजार ३९ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
३३८ नवे रुग्ण
३३८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाची संख्या २ हजार ३९ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर २७६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यातील मृत्यूदर १. ८७ टक्क्यांवर नोंदवला जात आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्क्यांवर नोंदवले जात आहे. मुंबईत सध्या १ हजार ४३० तर पुण्यात २८४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९५ पर्यंत पोहोचली आहे.
( हेही वाचा : विद्याविहारजवळील रेल्वे पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा, १५ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई)
राज्यात आतापर्यंत ८ कोटी ७ लाख ६० हजार ४०५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७८ लाख ८३ हजार ३४८ रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. राज्याचा पॉझिटीव्हीटी दर केवळ ९.७६ टक्क्यांपर्यंत असल्याने , काळजी करू नका असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.