MSRTC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! राज्य सरकारची एसटी महामंडळाला 300 कोटींची मदत

130

राज्य सरकारकडूने एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रूपयांची मदत एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रूपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने ३०० कोटी रूपयांचीच मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, या मदतीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारने द्यावा अन्यथा, सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागेल, असे म्हणत बरगेंनी इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा – MSRTC: एसटी महामंडळाचे ‘ते’ 118 कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू)

पुढे बरगे असेही म्हणाले की, या महिन्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी असून कर्मचाऱ्यांमध्ये मनस्तापाचे वातावरण आहे. त्यांची गैरसय झाली आहे. याबाबत कोर्टात त्रिसदस्यीय समितीने अहवाल दिला आहे. त्यानुसार चार वर्ष वेतनासाठी तरतूद केली आहे. मात्र, चार वर्ष होण्याअगोदरच अनियमितता सुरु आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची कुचंबना होत असल्याचे बरगे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.