कमांडोंच्या भत्त्यात दुप्पट वाढ! दरमहा मिळणार ८ हजार भत्ता

गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त भागात लढणाऱ्या कमांडोंच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागातील सी-६० पथकातील जवानांना सध्या देण्यात येणारा कमांडो भत्ता हा दरमहा ४ हजार रुपये आहे. या भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली असून या कमांडोंना आता दरमहा ८ हजार भत्ता मिळणार आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’कडून विद्यार्थ्यांना सवलतीत ‘बसपास’! जाणून घ्या दर)

नक्षलग्रस्त भागात लढणाऱ्या कमांडोच्या भत्त्यात दुप्पट वाढ

गृह विभागाच्या निर्णयानुसार आता सी -६० पथकातील कमांडोंना मिळणारा मासिक भत्ता ८ हजार रुपये इतका केला जाणार आहे. यामुळे नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या चळवळीला आणखी बळ मिळेल असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी सरकारकडून विशेष अभियान चालवले जात आहे. या अभियानात सी -६० पथकातील कमांडोंची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यामुळेच या कमांडोंच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ सी-६० पथकातील कमांडोंनाच लागू झाली असून इतर कमांडोंना याचा लाभ मिळणार नसल्याचे देखील गृह मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक के.पी. रघुवंशी यांनी १९९० मध्ये सी-६० पथकांची स्थापना केली. सुरूवातीला हे ६० कमांडोंचे पथक होते. यावरून सी-६० नाव देण्यात आले होते. सध्याच्या घडीला या पथकात १ हजार कमांडो आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here